ओळख

अरविंद जगताप
लेखक • दिग्दर्शक • गीतकार
जन्म: २० सप्टेंबर १९७७

अरविंद जगताप हे समकालीन मराठी साहित्य, नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील एक ठळक आणि प्रभावशाली नाव आहे. कवी, कथा, पटकथा, संवादलेखक आणि गीतकार म्हणून त्यांनी आपली स्वतंत्र शैली निर्माण केली आहे.

त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्यं म्हणजे सामाजिक भान, ग्रामीण वास्तवाचं प्रगल्भ चित्रण, मानवी भावभावनांचा नेमका स्पर्श, आणि उपरोध, विनोद व अंतर्मुख निरीक्षण यांचा सुरेख समतोल. त्यांची साहित्य, सिनेमा आणि ओटीटी या तिन्ही माध्यमांतून व्यक्त होण्याची शैली स्पष्ट, थेट आणि संवेदनशील असून समकालीन मराठी भाषेला समृद्ध करणारी आहे.

‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय मालिकेतील त्यांच्या पत्रलेखनामुळे ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. ‘पत्रास कारण की’, ‘सेल्फी’ आणि ‘गोष्ट छोटी डोंगरावढी’ ही त्यांची पुस्तके वाचकप्रिय आणि लोकप्रिय ठरली आहेत. ‘अप्पांचं पत्र’ हा त्यांचा लेख इयत्ता दहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकात समाविष्ट आहे, आणि नांदेड विद्यापीठाच्या बी.ए. मराठी अभ्यासक्रमात त्यांचा एक लेख अभ्यासासाठी समाविष्ट करण्यात आला आहे. त्याचसोबत ते महाराष्ट्रातील अनेक व्याख्यानमालांमध्ये वक्ता म्हणून सहभागी झाले आहेत. 

अरविंद जगताप हे ‘सह्याद्री देवराई फाउंडेशन’ या सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष आहेत. ही संस्था सह्याद्री परिसरात पारंपरिक देवराई पुन्हा जिवंत करण्याच्या उद्देशाने कार्यरत आहे. निसर्गाच्या समतोलासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या देवराया पुन्हा रुजवणे, त्यांचे जतन-संवर्धन करणे आणि उजाड डोंगरउतारांवर हिरवाई परत आणून समृद्ध जैवविविधतेचे जंगल निर्माण करणे, हे या संस्थेचे मुख्य कार्य आहे. पर्यावरणपूरक जीवनशैली व निसर्गसंवर्धनाची जाणीव रुजवणाऱ्या या उपक्रमात अरविंद जगताप यांचा सहभाग हे त्यांच्या सामाजिक भानाचे जिवंत उदाहरण आहे.

पुरस्कार
२००९

सलाम पुणे पुरस्कार

गाणे - विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती
२०१०

मटा सन्मान - उत्कृष्ट लेखक

चित्रपट - गोष्ट छोटी डोंगराएवढी
२०१०

झी गौरव नामांकन - संवादलेखन

चित्रपट - गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा
२०११

व्ही. शांताराम पुरस्कार

चित्रपट - मोरया
२०११

राज्य पुरस्कार - सर्वोत्तम गीतकार

गाणे - घर तरी दिसतंय का
२०१२

सह्याद्री सन्मान उत्कृष्ट गीतकार पुरस्कार

चित्रपट - डॅंबीस
छायाचित्रं
Coming Soon

Stay tuned for exciting updates!

नवीन पुस्तक, सिनेमा, गाणं, भाषण किंवा ब्लॉगवरील लेख — काहीतरी खास नक्कीच .. सविस्तर माहिती लवकरच.