म्हातारं
म्हातारं एका वेळी चार चार भाकरी खातं
म्हातारं एका वेळी चार चार भाकरी खातं
म्हातारं येणार्या जाणार्याकडं डोळे फाडून बघतं
म्हातारं कामवालीसोबत गुलुगुलू बोलत बसतं
म्हातारं मुद्दाम मळकट कपडे घालतं
म्हातारं रात्रभर कानात शिरुन खोकत रहातं
म्हातार्यानं घराचा नरक बनवलाय सगळा
‘मेलो रे … मेलो रे…’ म्हणतं पण म्हातारं मरतही नाही
ऐकता ऐकता
शेवटी एकदाचं मरुन गेलं म्हातारं
खुप चांगले होते
गिरणीवरुन दळूण आणायचे
कामवालीकडून चांगलं काम करुन घ्यायचे
साधेपणानं रहायचे
मुलांना खाऊ घालायचे
ते होते तोवर घराला कुलूप लावावं लागलं नाही कधी
म्हातारं माणूस असलं पाहिजे घरात, घराला आशिर्वाद मिळत राहातात
ऐकण्यासाठी
आता जिवंत नाहीय म्हातारं
<strong>मुळ कविता–विनय विश्वास</strong>
<strong>अनुवाद – पृथ्वीराज तौर</strong>
0 Comments