नेमाडे – बेस्ट पोएट्री
कधी पुरून ठेवलेल्या लिंबोळ्या विसरशील?
कधी पुरून ठेवलेल्या लिंबोळ्या विसरशील?
कधी त्यांचं उगवलेलं हिरवंगार रूप डूलताना नवल करशील?
फांद्यांनी भर उन्हात होकार दिले
असंख्य डीर अंगावरचे दाखवून हे मानशील?
आणि मी परत सगळं मागेन
ते विसरणं, ते कोंब, ते होकार, ते मानण_
नुसतच मानेनं सगळं ते परत देशील?
तुझी हार
गोंदणारणीकडून तुझ्या हातावर गोंदून घेईन.
– भालचंद्र नेमाडे.
0 Comments