युद्धाच्या गोष्टी!

1 August 2025

आमचा गावाकडचा मित्र नेहमी एक गोष्ट सांगतो.तरुण पोरांचा ग्रुप असतो. कॉलनीत कुणाला काही अडचण आली की ती पोरं हमखास धाऊन येणार. कुणाच्या घरी लग्न आसल की काम करायला पोरं. अडचण आली की मदत करायला पोरं. वर्गणी
गोळा करणार सण साजरे करणार. मदत वाटत फिरणार. आन त्या पोरांना सगळे कॉलनीवाले मनापासून मदत
करणार.

फक्त एक जन काही त्या पोरांना ताकास तूर लागू द्यायचा नाही. बरं माणूस काही साधा नाही. शेठ माणूस. चंदू शेठ. त शेठचा स्वभावच आसा की गप्पा मनसोक्त हाणणार पण खिशातून एक छदाम नाही काढणार. उत्सव आसा झाला पाहिजे, मदतकार्य तसं झालं पाहिजे. पण खिशातून रुपया नाही काढायचा.
त्याचा स्वभाव सगळ्याला माहित होता. म्हणून कुणी त्याला पैसे मागायचे नाही. असल्या लापट लोकाला पैसे मागून आपलाच टाईम खराब कोण करणार?

पण एकदा काय झालं नदीला पूर आला. पाणी शहरापर्यंत आलं. दोन दिवस राहील. सगळ्यांच नुकसान झालं. भल्या भल्या लोकांचे हाल झाले. तरुण पोरांनी मदत गोळा
करायला सुरुवात केली. एवढ्या वर्षात ते कधी शेठच्या नादी लागले नाही. पण ह्यावर्षी अडचण आशी होती की
त्यांनी शेठ्ला पैसे मागायचे ठरवले. तरुण पोरं कधी नाही ती गंभीर आडचन आली म्हणून चंदू शेठ कड गेले. म्हणले तुम्हाला त माहितीय पुरानी सगळ्याची वाट लावलीय. आपुन मदत केली पायजे. अशा टायमाला आपुन मदत नाही करायची त कधी करायची? चंदू शेठ हो म्हणला. बाकीच्या पोरांनी कुणा कुणाचे काय हाल झाले ते सांगायला सुरुवात केली. चंदू शेठनी त्यांच्या दुप्पट गोष्टी सांगायला सुरुवात केली. बोलता बोलता शेठच्या डोळ्या पाणी आलं.

शेठ आतल्या खोलीत गेला. पोरांना वाटलं आता नोटाचं बंडल आणतो काही की. पण शेठ आत मधून रुमाल घेऊन आला. डोळे पुसू लागला. पोरं खूप वेळ वाट बघत होती. एक जण न राहवून म्हणला, शेठ करायची ना मदत लोकाला? शेठ म्हणला, ह्यो काय प्रश्नय का? मदत त केलीच पायजे. कॉलनीची एवढी वाताहात झाली आन मी काय हातावर हात धरून बसून राहीन आस वाटलं का? पुन्हा शेठ लंब चौड बोलायला लागला. पुरानी
कशी वाट लागली कुणा कुणाची सांगायला लागला. एक जन वैतागून म्हणला, ते आम्हाला माहितीय शेठ. पण
तुम्ही काय करायचं ठरवलय ते सांगा. शेठ आता बाहेर आला. पायात चपला घातल्या. म्हणला, काय करायचं म्हणजे? आता मी सुद्धा तुमच्यासोबत मदत मागत फिरणार. कॉलनीसाठी एवढ करू शकत नाही का मी? चला.

दरवेळी ही गोष्ट वेगवेगळ्या संदर्भात आठवते. आता गेल्या काही दिवसापासून युद्धाचा संदर्भ आहे. आपल्यातले बहुतेक लोक असेच मी पण येतो तुमच्यासोबत म्हणणारे आहेत. कारण युद्धात आपण काहीच करू शकत नाही. घरी बसून बोलू शकतो. पण किती बोलायचं याला तरी लिमिट असली पाहिजे. जो उठतोय तो मोठमोठ्या गप्पा मारतोय. जे सैन्याला माहीत नाही ते लोकांना माहित आहे म्हणताहेत. अर्थात युद्धावर बोलण्यापेक्षा, मत व्यक्त करण्यापेक्षा आणखी एक गोष्ट सांगतो. खूप पुर्वी ऐकलेली.

कथा युरोपातली आहे. कथेची नायिका असलेली तरुणी एका बॉम्ब बनवण्याच्या कारखान्यात काम करते. युद्ध सुरू असल्याने खूप काम आहे तिथे. दिवसरात्र. त्यादिवशीही रात्री उशीर झाला तरी व्यवस्थापक कुणाला घरी सोडायला तयार नाही. त्यात ती तरुणी प्रेमात पडलेली. तिचा प्रियकर सैन्यात आहे. लढतोय. तिला कायम त्याची काळजी. बॉम्बमध्ये वात टाकण्याचं काम चालू आहे. ती स्वतःच्या विचारात. व्यवस्थापक बघतो. तिने वात चुकीची लावलीय. तो संतापतो. तिला हाकलुन देतो. युद्धाच्या रात्री ती एकटीच रस्त्याने चालतेय. विमानाचे आवाज येताहेत. अचानक एक बॉम्ब तिच्यापाशी येऊन पडतो. ती घाबरते. डोळे बंद करून जागीच बसते. सगळा खेळ संपला. हा विचार करत असताना मिनिट जातो. दोन मिनिट जातात. बॉम्ब काही फुटत नाही. ती डोळे उघडून बघते. त्या बाँब मध्ये पण वात चुकीची लागलीय. ती हलकेच हसते. समजून जाते. शत्रू देशात पण तिच्यासारखच कुणीतरी आहे जे प्रेमात पडलेलं आहे.

प्रेमाची ताकद मोठी असते. प्रेम करणारी माणसं, आपल्या माणसावर प्रेम करणारी माणसं युद्धाच्या विरोधात असतात. कुठल्याच सैनिकाच्या कुटंबाला युद्ध नकोसं असत. पण दुर्दैवाने अतिरेक्यांना पृथ्वीवरच्या प्रेमापेक्षा स्वर्गातल्या हूर प्रिय असतात. त्यांना माणसापेक्षा धर्माची काळजी असते. या नादात ते आपला धर्म आणखी बदनाम करत असतात.

पाकिस्तान हा आकडेवारीने कुठे आहे हे बघायची गरज नाही. धर्माच्या नावावर तयार झालेला देश आहे तो. ज्यात सगळ्या गोष्टी हळूहळू नापाक होत गेल्या. सगळ्यात भ्रष्ट सरकार, सगळ्यात भ्रष्ट सैन्य. पण त्यापेक्षा मोठी अधोगती आहे सगळ्यात वाईट प्रतिमा. युद्ध, दहशतवाद या गोष्टीसाठी कधीही वापरून फेकून देता येईल असा देश ही प्रतिमा. कायम कर्ज घेऊन जगणारा लाचार देश. हे सगळं धर्माचा अतिरेकी प्रभाव असण्याच कारण आहे. जे इस्लामिक देश आधुनिक जीवनशैली आत्मसात करू लागले ते चांगल्या स्थितीत आहेत. पाकिस्तान अजून शरियाच्या प्रेमात आहे. अफगाणिस्तान त्याच वाटेवर पुढे गेलाय. इराण आपली पत घालवतोय. सौदी अरेबिया, दुबई सारखे देश अमेरिकेशी व्यापार वाढवण्यात मग्न आहेत. या गोष्टीतून इतर देशांनी बोध घेतला पाहिजे. धर्माच्या नावावर फार दिवस राज्य टिकत नाही. बांगलादेश भाषेमुळे आणि सत्तेत वाटा नसल्याने बाहेर पडला.आता बलुचिस्तान त्या वाटेवर आहे. धर्माची नशा फार काळ टिकत नाही हे पाकिस्तानला कधी कळणार काय माहित? हैदराबादचा निजाम हा एकेकाळी जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस होता. पण रझाकार लोकांनी त्याचे काम भरले. धर्माची नशा दिली. सगळं उध्वस्त झालं. जुनागडचा नवाब पण खूप श्रीमंत होता. पण बेनझीर भुट्टोच्या आजोबांच्या नादी लागून पाकिस्तानात गेला. आणि उध्वस्त झाला. पुढे तर पेन्शन पण मिळेनाशी झाली म्हणे. धर्माच्या अतिरेकी प्रेमाने एकेकाळचा नवाब गल्लीबोळात फिरताना दिसू लागला. फक्त तो नवाब आहे हे कुणाला माहितीही व्हायचं नाही. आणि त्या जुनागडच्या नवाबाने फाळणीच्या वेळी रातोरात पाकिस्तानला पळून जाताना आपल्या विमानात सोबत कुणाला नेलं? आपल्या कुत्र्यांना. बायकोही मागे विसरला.

Monochromatic colors

Monochromatic branding is often minimalist and refined. A monochromatic brand color palette contains various shades of the same color. You start with a base color and add different shades through font, images, icons, materials, etc.

Monochromatic colors create a cohesive look for your brand and generate a soothing sense of tranquility. The primary color you choose establishes the rest of your brand color palette. So, choose a color relevant to your industry that embodies your brand personality.

Atmospheric photography

Photos generate an emotional connection by depicting real people, the environment, and beautiful objects. In 2023, we’re seeing brands opt for a minimal logo paired with original photography to portray their personality and products.

Picture the grainy effect of a polaroid or the nostalgic look of 35mm film. They create an atmosphere that draws people in. Studio photography is being replaced with beautiful candid shots that can be taken from any camera.

This accessible form of photography inspires consumers who yearn for simple, creative branding they can relate to. This trend is ideal for nostalgic brand marketing. A perfect example is Kinn jewelry. Their minimal logo and photography are simple, accessible, and beautiful. Like their products!

This trend works well for brands that want to grow their presence on photo-driven social media and sell products rather than services. Photos help us visualize using the product or attaining a specific lifestyle. This is what makes photography so effective!

Simple maximalism

You don’t need to go down a design rabbit hole to create a brand that stands out. A bold font, a striking color palette, and mindful use of negative space are enough.

Choose one design element, like a font or color palette, and make it striking! Try balancing the simplicity of a serif font with a clashing color palette of electric blue, neon green, and yellow. Or, you could use a large, bold display font with a muted pink and blue palette.

In 2023, brands opt for simple elements that pack a punch to get their message across. This branding trend rose from the need for simplicity and structure without sacrificing creativity.

It’s a modern look and suits up-and-coming brands that offer a unique product or service. Or for businesses that want to stand out from a loud and crowded market.

Tags

तुम्हाला काय वाटतं?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वाचण्यासारखे...