झेंडा

जगण्याच्या वारीत मिळेना वाट,
जगण्याच्या वारीत मिळेना वाट,
साचले मोहाचे धुके घनदाट
आपली माणसं,
आपलीच नाती
तरी कळपाची मेंढरास भीती
विठ्ठला.. कोणता झेंडा घेऊ हाती ?
आजवर ज्यांची वाहिली पालखी
भलताच त्यांचा देव होता,
पुरे झाली आता फुका माथेफोडी
दगडात माझा जीव होता
उजळावा दिवा म्हणुनीया किती
मुक्या बिचार्या जळती वाती..
वैरी कोण आहे इथे कोण साथी,
विठ्ठला.. कोणता झेंडा घेऊ हाती ?
बुजगावण्यागत व्यर्थ हे जगणं
उभ्याउभ्या संपून जाई
खळं रितंरितं माझं बघुनी उमगलं,
कुंपण हितं शेत खाई
भक्ताच्या कपाळी सारखीच माती
तरी झेंडे येगळे, येगळ्या जाती
सत्तेचीच भक्ती सत्तेचीच प्रीती,
विठ्ठला.. कोणता झेंडा घेऊ हाती ?
गीतकार – अरविंद जगताप.
चित्रपट– झेंडा
0 Comments